तेर/प्रतिनिधी
 उस्मानाबाद तालुक्यातील  तेर येथील दुचाकीस्वारास मारहाण करून लुटल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून दोघे जण फरार झाले आहेत.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील संदीप कचरे 20 एप्रिलला चिखली येथील शेताकडे दुचाकीवरुन जात असताना वानेवाडी शिवारात आले असता पाठीमागून एका दुचाकीवरून चौघेजन अनोळखी व्यक्तींनी  पाठलाग करून कचरे यांच्या दुचाकीला गाठले. त्यांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात नेऊन लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. यानंतर त्यांच्याजवळील रोख 32 हजार रुपये, एक मोबाईल, हातातील सोन्याची अंगठी, घड्याळ असा एकूण 64 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. या घटनेबाबत संदीप कचरे यांनी ढोकी पोलिस ठाणे येथे फिर्याद दाखल केली. या घटनेबाबत ढोकी पोलिसला स्टेशनला आज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला  होता. या प्रकरणाचा तपास ढोकी पोलिस स्टेशनचे सपोनि बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तेर दुरक्षेञचे   बीट अंमलदार प्रकाश राठोड यांनी  कसून तपास करून शाम लक्ष्मण पवार(तेर) यांच्याकडून आठ हजार रुपये व मोबाईल जप्त केला तर महादेव बळीराम साळुंके(तेर) यांच्याकडून तीन हजार रुपये जप्त केले असून दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर दोन आरोपी फरार आहेत. सपोनि बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तेर दूरक्षेत्राचे बीट अंमलदार प्रकाश राठोड यांनी चोरीचा पर्दापाश केला आहे.
 
Top