उस्मानाबाद / प्रतिनिधी-
यशस्विनी सामाजीक अभियान उस्मानाबाद च्या वतीने कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना चिककी आणि राजगिरा लाडु यांचे वाटप जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, उपविभागीय पोलीस अधीक्षक मोतीचंद राठोड, यशस्विनी च्या जिल्हा समन्वयक अँड मनिषाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अंतर्गत यशस्विनी सामाजीक अभियान च्या संचालिका खा सुप्रियाताई सुळे, राज्यस्तरीय समन्वयक वैशालीताई मोटे यांनी विडीओ काॅनफरनस च्या आधारे यशस्विनी सामाजीक अभियांन च्या महाराष्ट्रातील जिल्हा समन्वय यांच्याशी संवाद साधला होता.यावेळी सुप्रियाताई सुळे यांनी सध्या कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती मध्ये यशस्विनी सामाजीक अभियान च्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले होते.
तसेच मुख्य समन्वयक सुरेखाताई ठाकरे यांनी राज्यातील सर्व समन्वयक यांनी दररोज किमान 50 लोकांना फोनवरून कोरोना जनजागृती साठी फोन करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्या नुसार जिल्हा समन्वय अँड मनिषाताई पाटील यांनी आज पर्यत साधारण 1400 लोकांना फोनवरून माहिती सांगितली आहे.  
 
Top