तुळजापूर/ प्रतिनिधी -
तुळजापूर सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या तामलवाडी येथील कांचन हाँटेल शेजारी.इंधन  टँकर मधुन इंधन चोरी   करणारा व त्यास सहकार्य करणाऱ्या अन्य सात जण अशा एकूण आठ जणांना ताब्यात घेवुन त्यांच्या कडून एक कोटी २३ लाख ८९ हजार  ६०० रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेवुन इंधन चोरी करणाऱ्या मोठ्या रँकेटचा पर्दाफाश   उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तुळजापूर यांनी सोमवार दि.27 रोजी दुपारी 12.30 वाजता केला. तामलवाडी येथील स्थानिक राजकारण्यांच्या सहकार्याने येथे गेली अनेक वर्षापासुन इंधन चोरीचे रँकेट कार्यान्वित होते माञ उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ. दिलीप टिपरसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे रँकेट उध्द‌वस्त केले आहे. या कारवाईचे तामलवाडी भागात स्वागत होत आहे. विशेष म्हणजे तामलवाडी येथे पोलिस स्टेशन कार्यान्वित असताना उपविभागीय पोलीस अधिकारी तिथे जावुन ही कारवाई केल्याने स्थानिक अधिकारी चा कर्तव्या बाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे.
या बाबतीत अधिक माहीतीअशीकी सोलापूर तुळजापूर रस्त्यावरून पेट्रोल डिझैल इंधन टँकर मार्ग उस्मानाबाद लातूर जिल्हयात वितरीत करण्यासाठी जाते. सोलापूर उस्मानाबाद सरहद्द वर असणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी सरहद्द असणाऱ्या कांचन बिअर बार शेजारील गटनंबर 389मध्ये इंधन टँकर मधुन इंधन चोरुन विकण्यासाठी काढले जात आहे, अशी  माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ.दिलीप टिपरसे यांना मिळताच त्यांनी तात्काळ तिथे जावुन छापा मारला असता इंधन टँकर मधुन पाईप चा सहाय्याने इंधन काळ्या बाजारात कमी किंमतीत विक्री करण्यासाठी टँकर चालकांना थोडे पैसे देवुन काढत असताना राजु उल्हास पिरंगे मिळुन यावेळी तिथे असलेल्या सात टँकर चालकास व  इंधन काढणा-या राजु पिरंगे यास ताब्यात घेतले. हे टँकर इंडीयन आंईल व भारत प्रेट्रोलियमचे आहेत  इंधन टँकर मधील इंधन काढण्यास सहकार्य करणारे चालक  रमेश झोरीयम यादव  जयसिंग मोतीलाल  दवणे ,भारत रामेश्वर  यादव सीतलप्रसाद अजोदीया प्रजापती  प्रजापती सचिन रेवणसिध्द माळी रियाज नजीर इटकळे  शंकर शिवाजी अडगळे सर्व (रा. सोलापूर) व इंधन काढणारा राजु उल्हास पिरंगे रा तामलवाडी (ता. तुळजापूर ) यांना ताब्यात घेवुन त्यांच्या विरोधात सपोनी शरदचंद्र रोडगे यांनी दिलेल्या फिर्याद वरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई ही धाडसी कारवाई स्वता उपविभागीय पोलीस अधिकारी  डॉ.दिलीप टिपरसे  व सपोनि रोडगे, पोना राऊत पोका घुसिंगे,भुतेकर यांनी  केली.
 
Top