कळंब / प्रतिनिधी-
संचारबंदी लॉकडाऊन  मुळे रोजगार हिरावलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना कळंब येथे बुधवारी दि.29 रोजी कळंब तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी कार्याल्य  यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी अहिल्याबाई गाठाळ ,तहसीलदार मंजुषा लटपटे, नायब तहसीलदार पठाण, जमादार ,यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक यांच्या हस्ते जीवनावश्यक  साहित्याच्या किटचे वाटप १६ मुलांना  करण्यात आले, कोरणा रोगाच्या प्रतिबंधासाठी संचार बंदीमुळे वृत्तपत्र छपाई, वाहतूक, वितरण ,वसुली  आदी कामे ठप्प झाली आहे त्यामुळे लाखो कामगार ,कर्मचारी, वर्तपत्र विक्रेत्यावर उपजीविकेचे संकट आवासुन उभे टाकले आहे याची दखल घेऊन उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांची  सोमवारी दि.20 रोजी भेट घेऊन वृत्तपत्र विक्रेत्यांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्याची मागणी केली होती. यावर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी दखल घेऊन मान्यता दिली त्यानुसार कळबं येथे बुधवारी दि. 29 रोजी तहसील कार्यालयाच्या वतीने व उपविभागीय अधिकारी अहिल्याबाई घाटाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळबं तालुका पत्रकार संघाने वृत्तपत्र हॉकर्स व विक्रित्ये यांना या किटचे वाटप करण्यात आले याप्रसंगी वृत्तपत्र विक्रेते रामलिंग गाढवे, अंकुश होंडे हे उपस्थित होते यावेळी एकूण 16 वृत्तपत्रे टाकणाऱ्या मुलांना या किटचे वाटप करण्यात आले. या वेळी वृत्तपत्र वाचक दिलीप पवार, नरेश जोशी,भागवत चोंदे,सुखदेव शिंदे हजर होते.
 
Top