तुळजापूर/प्रतिनिधी -
कोरोना पार्श्वभूमीवर संकट काळात नागरिकांना मदत करण्यासाठी उपक्रम राबविले जातायात. पण यावेळी सोशल डिस्टंन्स न पाळल्याने त्याचा फैलाव होण्याचा धोका वाढलाय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणताही सोशल उपक्रम घेऊ नये, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी  दिलीप टिपरसे यांनी केले.
कोरोना लाँकडाऊन पार्श्वभूमीवर नागरिक दानशूर सामाजिक संघटना अन्नदान फुडपॅकेटींग करुन वाटप करीत आहेत. तर काही संघटना व रक्तदान शिबीर घेत आहे. हा मदतीचा हात देणारा उपक्रम स्तुत्य कौतुकास्पद असतो. पण यावेळी सोशल डिस्टंन्स बाबतीत कोणतेही खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे कोरोनासारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुढे सामाजिक संघटना किंवा संस्था, नागरिक अन्नधान्य, फुड पेकॅटींग किंवा रक्तदान इत्यादी उपक्रम पोलिस प्रशासनाची परवानगी घेतल्याशिवाय येऊ नयेत, जर अशा प्रकारचे कार्यक्रम कोणी आयोजित केल्याचे मिळून आल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली कारवाई करण्यात येईल. तसेच कोणीही मंदिर, मशिद इत्यादी ठिकाणी सामूहिक प्रार्थना करणार नाही, किंवा रस्त्यावर लोकांची गर्दी होईल, असे उपक्रम राबवू नयेत. सर्वांनी सोशल डिस्टन्स ठेवून कोरोना विषाणूच्या लढ्यात सर्व स्तरावरील प्रशासनास सहकार्य करून कोरोना रोगाचा मुकाबला करण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी केले.

 
Top