तुळजापूर / प्रतिनिधी -
कोवीड- १९ या विषाणुचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत देश लाॅकडाऊन करण्यात आला होता .या लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये घरी थांबणाऱ्या कामगाराना कामावर आहे,  असे समजुन वेतन देण्यात यावे असे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सर्व आस्थापनाना आदेश देण्यात आले.परंतु तामलवाडी येथील पी.पी.पटेल आणी पावडर मॅटोलाॅरजि डीव्हीजन या आस्थापनेने लाॅकडाऊन काळात वेतन देण्यास नकार दिला अशी तक्रार भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष शिवाजी सावंत यानी प्रशासनाकडे ईमेलद्वारे करताच सर्व कामगारांचे वेतन तात्काळ देण्यात यावे असे पत्रात नमुद करण्यात आले आहे.
कोविड - १९ या विषाणुने जगभर थैमान घातले असुन भारत देशामध्येही या विषाणुने कहर केला आहे.या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये दि.२२ मार्चपासुन २१ दिवसाचा लाॅकडाऊन घोषीत करण्यात आला तो लाॅकडाऊन पुढे ३ मे पर्यंत वाढवण्यात आला या लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये काही अत्यावश्यक सेवा देणारी आस्थापने वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत परंतु यामध्ये काम करणार्या कामगाराना घरी थांबुन संपुर्ण वेतन देण्यात यावे असे केंद्र व राज्य शाहनाच्या वतीने सांगण्यात आले. परंतु तामलवाडी येथील पी.पी.पटेल आणी पावडर मॅटोलाॅरजि डीव्हीजन या आस्थापनेने कामगाराना वेतन व भत्ते दिले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे .कामगार संघटनेच्या वतीने आस्थापनेकडे दुरध्वनीवरून वेतनाची मागणी केली असता त्यासही प्रतिसाद दिला नाही.
लाॅकडाऊन काळात कामगारांना वेतन मिळत नसल्याचे पाहुन तसेच या आस्थापनेत कामगारांना अनेक सुविधापासुन वंचित रहावे लागत असल्याने याबाबत भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी सावंत यानी कामगार राज्य  मंत्री,पालकमंत्री धाराशिव तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे दि.१७ रोजी ईमेलद्वारे तक्रार केली होती.या तक्रारीचे प्रशासनाच्या वतीने निवारण करण्यात आले असुन तामलवाडी येथील पी.पी.पटेल आणी पावडर मॅटोलाॅरजि डीव्हीजन या आस्थापनेने कामगारांचे वेतन तात्काळ देण्यात यावे असे प्रशासनाच्या वतीने शिवाजी सावंत याना उत्तरादाखल दिलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या या पत्राच्या अनुषंगाने कामगारांना  तात्काळ वेतन नाही मिळाल्यास  आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असे भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी सावंत यानी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे
 
Top