लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी तथा प्रगतशील फळ बागायतदार शेतकरी दत्तात्रय सुतार यांनी त्यांच्या शेतातील १० एक्कर चिक्कूची बाग ही सामाजिक बांधिलकी जपत कोरोना रोगाचा प्रादुर्भाव पसरू नये, यासाठी दिवसरात्र कर्तव्य बजावत असलेल्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मोफत खुली करून दिली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ तहसीलदार विजय आवधाने (लोहारा) यांच्या हस्ते करण्यात आला.
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील रहिवाशी असलेले सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी तथा प्रगतशील शेतकरी म्हणून दत्तात्रय सुतार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी त्यांच्या शेतात १० एक्कर चिक्कूची बाग जोपासली असून यंदा पाऊस ही चांगला झाल्याने झाडांना चिक्कू मोठ्या प्रमाणावर लागले असून लाखो रुपयांचे उत्पन्न निघणे अपेक्षित आहे. बाजारपेठेत चिक्कूला मोठी मागणी असून भाव ही चांगला मिळत आहे. असे असतानाही सुतार कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सध्या जगासह, देश, राज्यात कोरोना रोगाने हाहाकार माजवला असताना हा आजार कोणालाही होऊ नये, यासाठी दिनरात्र कार्य करणाऱ्या लोहारा तालुक्यातील आरोग्य विभागाच्या वैद्यकीय, अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यासह आदी, ठिकाणी कर्तव्य बजावत असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व रुग्णांना चिक्कूची बाग मोफत खुली करुन दिली आहे. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी अशोक काळे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, स्पर्शचे प्रकल्प अधिकारी डाॅ. रमाकांत जोशी, दत्ता वाघमारे, दत्तात्रय सुतार, यांच्यासह आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत अाहे.