उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाउन व सीमा बंदी आदेश लागू असतानाही उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या२ अधिकाऱ्यांनी याचे उल्लंघन केल्याचे उघड झाले असून त्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय कोलते यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांच्यासह मुख्य लेखा व वित्त अधिकारी एस जी केंद्रे या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून २४ तासात लेखी खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. अजिंक्य पवार यांनी पुणे तर केंद्रे यांनी औरंगाबाद जिल्हा वारी केल्याचे समोर आले आहे तर पवार यांच्यासोबत आणखी एक अधिकारी सौबत पुणे येथे गेल्याची चर्चा होत आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कोलते यांनी कारणे दाखवा नोटीस काढली असून त्यात जिल्हाधिकारी यांनी सीमा बंदी केल्याच्या आदेशाचा उल्लेख आहे. १८ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या मुख्यालयातील अधिकारी यांच्या उपस्थितीचा आढावा कोलते यांनी घेतल्यानंतर काही अधिकारी विना परवानगी इतर जिल्ह्यात गेल्याचे समोर आले. जिल्हा परिषद मुख्यालय सोडण्यापूर्वी पूर्व परवानगी घेणे आवश्यक होते मात्र तसे न केल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी आदेशाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत कर्तव्यात कसूर केल्याने भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व महाराष्ट्र कौविड २०१९ उपाययोजना नियम २०२० नुसार कार्यवाही का करण्यात येऊ नये अशी नोटीस काढली असून २४ तासात खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचे नमूद केले आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी शासकीय कागदपत्रेयांचा आधार घेत कुटुंबाला भेटण्यासाठी पुणे दौरा केल्याचे समोर आलेआहे तर केंद्रे हे सुद्धा औरंगाबाद येथे गेलायची माहिती आहे. हे दोन्ही अधिकारी कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या पुणे व औरंगाबाद येथे जाऊन आल्याने खळबळ उडाली आहे. पवार हे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असून त्यांनी रातोरात केलेल्या पुणेवारीमुळे त्यांची चांगलीच पंचायत झाली आहे. पवार व केंद्रे यांनी लॉकडाउन काळात जिल्हा बंदी व संचार बंदी असतानाही शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर नियमाप्रमाणे गुन्हा नोंद करावा अशी मागणी होत आहे.
बेजबाबदारपणे शासकीय पदाचा गैरवापर करणाऱ्या यार अधिकारीबाबत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. पवारी हे पुणे येथून आल्याची बाब उघड झाल्यानंतर त्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानात कवारनटाईन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एरव्ही सामान्य नागरिकाने कोरोना नियमाचे उल्लंघन केल्यानंतर त्याच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करीत कायदेशीर कारवाई केली जातेमात्र उस्मानाबाद जिल्हा परिषदेत कारवाई कोण करायची यावर खलबते सुरु असून एकमेकांवर जबाबदारीची चालढकल होत आहे. नियम फक्त जनतेलाच व काही अधिकारी मात्र मोकाट अशी स्तिथी असून एकमेकांची पाठराखण केली जात आहे.
 
Top