कळंब/प्रतिनिधी-
कळंब येथील रहिवासी व सध्या लातूर येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन ड्रेस डिझायनिंग अँड गारमेंट मॅन्युफॅक्‍चरिंग या कोर्सला शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कु. वैष्णवी विक्रम मोरे हिने लॉकडाऊन काळामध्ये तब्बल १०,००० मास्क ची निर्मिती केली आहे.तसेच या मास्कपैकी 1000 मास्क तिने सामाजिक भावनेतून वेगवेगळ्या संस्थांना व गरजूंना मोफत वितरित केले आहेत.                 
लॉक डाऊन होण्याच्या दोन दिवसापूर्वी तिच्या शिक्षिका श्रीमती ए.एन.यादव मॅडम यांनी मास्क बनवण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसाठी घेतले होते त्या प्रत्यक्ष उपयोग तिने लागलीच या काळात केला व खास मास्क बनवण्यासाठी नवीन इंडस्ट्रियल शिलाई मशीन खरेदी करून स्वतः मास्क ची निर्मिती चालू केली.
आजपर्यंत तिने तिची भाच्ची आस्था मोरे हिच्या वाढदिवसानिमित्त २००, उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे २०० तसेच तहसील कार्यालय, पोलिस ठाणे ,कळंब पत्रकार संघ, रोटरी क्लब, गणपतराव कथले युवक आघाडी, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब यांना प्रत्येकी १००  मास्क मोफत वाटप केले आहेत. तसेच उर्वरित मास्कची अतिशय अल्प दरामध्ये तिने विक्री केली.कोरोणाच्या संकटाच्या काळामध्ये लोकांच्या सुरक्षेची गरज ओळखून तिने हे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य केले . तिला या कामात  तिची बहीण विशाखा, आई  कल्पना, भाच्ची आस्था, भाऊ आर्यन, परमेश्वर  प्रा.डॉ.किशोर मोरे,  परमेश्वर  मोरे यांची मदत मिळाली.
तिच्या या सेवाभावी कामा बद्दल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जे.के.वायदंडे, कळंब  तहसीलच्या नायब तहसीलदार श्रीमती परवीण पठाण, शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन लातूर चे प्राचार्य डॉ.ए.एम. आगरकर, सावित्रीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री श्रीधर ( बाबा) भवर , पत्रकार संघाचे विश्वस्त श्री सतीष बप्पा टोणगे, ज्ञानेश्वर  पतंगे ,श्री रमेश आंबेडकर श्री बालाजी सुरवसे , ओंकार कुलकर्णी, रोटरीचे अध्यक्ष हर्षद अंबुरे यांनी कौतुक केले आहे.

 
Top