उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केलेला आहे.अशा गंभीर परिस्थितीत अनेक सर्व सामान्य कुटुंबांचा रोजगार बुडाला असल्याने त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  शंकरराव गडाख  ,खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आ.कैलास घाडगे पाटील,यांनी श्री.शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यातील आळणी येथे जीवनावश्यक कीटचे वाटप केले .
यावेळी रवि कोरे आळणीकर,शिवसेना उप तालुकाप्रमुख धनंजय वीर,पोलीस पाटील प्रमोद वीर,ग्राम रोजगार सेवक दादासाहेब गायकवाड,सुनिल माळी,शाम लावंड आदींची उपस्थिती होती. 
 
Top