उस्मानाबाद/ प्रतिनिधी-  कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. 
उस्मानाबाद येथील ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पालकमंत्री  शंकरराव गडाख  यांनी मा. मुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या विनंतीनुसार व राजशिष्टाचार विभागाच्या मान्यतेने पर्यावरण, संसदीय कार्य, भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा व स्वच्छता व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते दि. 1 मे, 2020 रोजी सकाळी 8.00 वाजता जिल्हाधिकारी  कार्यालयात संपन्न होणार आहे . 
या कार्यक्रमास केवळ जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते हे उपस्थित राहणार आहेत.
 
Top