तुळजापूर /प्रतिनिधी-
  जनतेच्या सेवेसाठी तुळजापूर शहरात  ठिकठिकाणी आपले कर्तव्य बजावणा-या  पोलीसांना व नगरपरिषद कर्मचा-यांना पोलीस खात्यातील माजी महिला पोलीस कॉ. विमलताई पैठणकर, यांनी चहा व नाष्टा पुरवून पोलीसांप्रती असणारा आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
तुळजापूर शहरातील उस्मानाबाद रोड, घाटशीळ रोड, पोलीस स्टेशन आदी ठिकाणी कर्तव्य बजावणा-या पोलीसांना चहा व नाष्टा देण्यात आला. त्यांना पञकार कु. किरण चौधरी, राहूल मस्के, आशा व्यवहारे यांनी सहकार्य केले. यावेळी  पोलीसांनी या कार्याचे कौतुक करत आभार मानले.

 
Top