
तालुक्यातील आरळी खुर्द “ येथील विद्यार्थ्यांसाठी “कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी माझी भूमिका “या विषयावर घेण्यात आलेल्या ऑनलाइन निबंध स्पर्धत घर गाव राज्य देश कोरोना पासुन वाचविण्यासाठी जनजागृती करुन घरीच राहा स्वस्थ राहा सुरक्षित राहा असा संदेश या चिमुकल्यांनी
स्पर्धतुन दिला.या स्पर्धात छोट्या गटात प्रथम क्रमांक प्रणव फुलचंद पौळ व मोठ्या गटात प्रतिभा सुभाष निचळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
कोरोना प्रसार रोखण्यासाठी मुलांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असल्याने या कालावधीत ही अनोखी निबंधस्पर्धचा उपक्रम शिक्षकांनी राबविला . ही स्पर्धा कोरोना सहाय्यता समिती ग्रामपंचायत आरळी खुर्द, जि प प्रा शाळा आरळी खुर्द व कदम शिक्षक वृंदांनी आयोजित केली होती .यात चोवीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेत यांना मिळाले यश
ऑनलाईन निबंध स्पर्धेत छोट्या गटामध्ये प्रथम प्रणव फुलचंद पौळ, व्दितीय कारण अभिमाने गाडे
उत्तेजनार्थ जोया सय्यद व्हगेव, किरण अभिमान गाडे, मोठ्या गुटात प्रथम प्रतिभा सुभास निचळ, व्दितीय सानिया पठाण यांनी मिळवला या विजेत्यांना लवकरच रोख रकमेचे परितोषक देवुन गौरविण्यात येणार आहे