तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील काक्रंबा येथील हंगरगा रस्त्यावर असणाऱ्या एका जुन्या कच-या टाकल्या जाणाऱ्या  विहीरीत पाच ते सहा महिन्याच पुरुष जातीचे मृत बालक आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संचार बंदी असताना ही घटना घडल्याने या बाबतीत आधिक चर्चेला उधाण आले आहे. सदरील घटना शनिवार दि.12रोजी दुपारी एक वाजण्याचा सुमारास उघडकिस आली.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, ( काक्रंबा ता. तुळजापूर)  येथे हंगरगा रोडला जुनी विहीर असुन यात आजुबाजुचे लोक कचरा टाकतात शनिवार दि. 12 रोजी एक महिला दुपारी एक वाजता कचरा टाकावयास गेली असता पंधरा फुट विहीरीत कुञे सदरील बालकाचे लचके तोडत असल्याचे दिसताच याची माहीती पोलिस पाटील कोरेकर यांना देण्यात आली, त्यांनतर त्यांनी बीट अमंलदार मिटके यांना सांगताच ते घटनास्थळी आले व सदरील अर्भकाचा मृतदेह  उपजिल्हारुग्णालय येथे शवविछेदन केल्यानंतर रविवारी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनकडे सपूर्द केल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
Top