उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कोरोना विषाणूमुळे आपत्कालीन परिस्थितीती  निर्माण झाली आहे. या परिस्थितीत नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा सुरु आहे. तो चालू राहणे गरजेचे आहे. त्यानुसार स्वस्त धान्य दुकानातून पात्र लाभार्थ्यांना धान्याचे  वाटप करण्यात येत आहे . या संदर्भात नागरिकांकडून धान्य कमी मिळणे, पावती न मिळणे, अन्नापासून वंचित ठेवले जात आहेत. अशा तक्रारी महाफूड पोर्टल, आपले सरकार पोर्टल, जिल्ह्याची  व्हॉटसॲप तक्रार निवारण प्रणाली स्तरावर प्राप्त होत आहेत. तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यानुषंगाने जिल्हास्तर, तालुकास्तर भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्या अधिनस्त कर्मचारी यांची पथकामध्ये नियुक्ती करावी.
जिल्हा स्तरावरील भरारी पथकातील अधिकाऱ्यांची नावे, पदनाम आणि मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
 श्री. संतोष पाटील, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मोबाईल-8805133056, श्री.सचिन काळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, मोबाईल-9960188552 यांची नेमणूक करण्यात आली आहे.तालुका स्तरावरील भरारी पथकातील अधिकाऱ्यांची नावे, पदनाम आणि मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. श्री. राजाराम केलुरकर, नायब तहसीलदार पुरवठा, उस्मानाबाद मोबाईल-8329828391, श्री. संदीप जाधव, नायब तहसीलदार पुरवठा,तुळजापूर मो.9730948252, श्री.विलास तरंगे नायब तहसीलदार पुरवठा,उमरगा मो.9762719873, श्री. रणजीत शिराळकर, नायब तहसीलदार पुरवठा, लोहारा मो.9702085040, श्री. पंडीत राठोड, नायब तहसीलदार पुरवठा,भूम मो.9421841447, श्री.मिलींद गायकवाड नायब तहसीलदार पुरवठा,परंडा मो.7588595422, श्रीमती स्नेहलता पाटील, नायब तहसीलदार पुरवठा, वाशी मो.9623614400, श्रीमती परविन पठाण, नायब तहसीलदार पुरवठा, कळंब मो.982261007 यांची नेमणूक करण्यात आली आहे .       
कोविड 19 नुसार उद्ववलेल्या प्राप्त तक्रारी विचारात घेऊन या भरारी पथकामार्फत 48 तासात प्राप्त तक्रारीची तपासणी करुन आवश्यक ती कार्यवाही करुन त्याचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी उस्मानाबाद यांना सादर करण्याचे आदेश दिले आहेत .
 
Top