उस्मानाबाद/प्रतिनिधी
जिल्हयात कोरोनाग्रस्त दोन रूग्ण आढळल्यानंतर प्रशासन हादरले असून जिल्हा प्रशासनाने जिल्हयात शनिवार दि.४ एप्रील व रविवार दि. ५ एप्रील या दोन दिवशी जनता कर्फ्यु लागु केला आहे. या दोन्ही दिवशी मेडीकल, स्वस्त धान्य दुकान आणि दुध विक्री केंद्र यांना वगळयात आले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात ताज हॉटेल मुंबई, दिल्ली, इस्लामपुर येथुन उस्मानाबाद जिल्हयातील रहिवाशी आल्यामुळे उमरगा  तालुक्यात एक रूग्ण तर लोहारा तालुक्यात दुसरा रूग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे दोन्ही रूग्ण कोरोनाग्रस्त आढल्याने त्यांच्या संपर्कात १५ ते ३० लोक आल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये वाढ हो‌ऊ नये म्हणुन जिल्हा प्रशासन ने पुन्हा शनिवार व रविवारी जनता कर्फ्यु लागु केला आहे
 होम क्वारंटाईनवाल्यांना आवाहन
या दोनी ही कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना प्रशासनाने होम क्वारंटाईन  केलेले आहे. त्याच प्रमाणे मुंबई, पुणे व परदेशातुन आलेल्या कांही लोकांना लोकांना होम क्वारंटाईन  केल्यामुळे  त्यांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top