तुळजापूर /प्रतिनिधी-
 तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे वाढदिवसा निमित्ताने पार्टी तील मांसाहारी भोजणाचा आस्वाद घेताना पोलिसांनी सहा  जणांना ताब्यात घेतले माञ  पाच जण पळुन जाण्यात यशस्वी जाले. यावेळी घटना स्थळावरुन कार मोटारसायकल  पार्टीचे साहित्य असे एकुण 1045300 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवार दि.21 रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आली.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, नळदुर्ग येथे इंद्रजित उर्फ मिटु रणजितसिंग ठाकुर यांनी  आपल्या वाढदिवसानिमित्ताने मांसाहारी पार्टीचे आयोजन केले यास मिञांना बोलवले माञ पोलिसांना याची माहीती मिळताच घटनास्थळी दाखल होवुन मांसाहारी पार्टीचा आस्वाद घेताना इंद्रजित उर्फ मिटु रणजितसिंह ठाकुर ,विश्वजित रणजितसिंह ठाकुर ,सौरभ दत्तुसिंग गहेरवार ,सुदर्शन योगेश जाधव ,महेश दिनेशसिंग हजारे, अहमद गौस युनुस कुरेशी सर्व रा नळदुर्ग हे तोंडाला मास्क न बांधता सध्या जगात व देशात कोरोना व्हायरसचा फैलाव होत असताना  एकञित वाढदिवसाची पार्टी करताना मिळुन आल्याचा कारणावरुन पोलिसांनी ताब्यात घेवुन त्यांच्या वर योग्य ती कारवाई केली$ सदर ठिकाणा वरुन माञ रोहीत राठोड, संग्राम ठाकुर ,दादा  शिंदे ,बालाजी कांबळे, सुरज मस्के पळुन गेले. माञ वरील लोकांना घेवुन आलेली कार मोटार सायकल पार्टी साहित्य असे एकुण 1045300 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. 
 
Top