परंडा /प्रतिनिधी-
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखन्या साठी संचार बंदी लागु असताना हेअर सुलन चे दुकान का उघडले अशी विचारणा करणाऱ्या पोलिस पाटील यांना मारहान करून जखमी केल्याची घटणा परंडा तालूक्यातील पाचपिंपळा येथे दि.१ एप्रील रोजी सकाळी ८- ३० वाजता  घडली या प्रकरणी तीन जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत परंडा पोलिसा कडुन मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील पाचपिंपळा येथील बस थांब्या जवळ असलेले  हेअर सलुन चे दुकान उघडे असल्याने पोलिस पाटील अनंत धुमाळ यांनी दुकानदार गौतम लोखंडे यांना संचार बंदीचे नियम तोडून दुकान का उघडले असे  विचारना केल्याने , गौतम लोखंडे , मुकेश गौतम लोखंडे दोघे राहणार पाच पिंपळा व दत्ता काशीद राहणार पुणे या तिघांनी संगणमत करून पोलिस पाटील धुमाळ यांना लाथा बुक्याने मारहान करीत गौतम लोखंडे याने डोक्यात दगड मारून जखमी केले .
पोलिस पाटील धुमाळ यांच्या फिर्यादी वरून तिघा आरोपी विरुद्ध भादवी कलम ३२४ , ३२३ , ५०४ , ३४ , १८८ सह महाराष्ट्र कोविड उपाययोजना २०२० चे नियम ११ नुसार येथील पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top