उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात व देशात आणि जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्याचे  पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी श्री शनैश्वर देवस्थानच्या माध्यमातून  गोरगरीब जनतेसाठी व ज्यांना खरच धान्य भेटलेले नाही अशा उमरगा व लोहारा तालुक्यातील व्यक्तींना 1500 किट उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्याचे वाटप आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने गोरगरीब व मोलमजुरी करणाऱ्या जनतेला आपली उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून स्वस्त धान्य दुकानातून   प्रत्येक व्यक्तीला 5 किलो तांदूळ मोफत देण्यात आले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे काही जनतेला तांदूळ पोहचले नाही म्हणून जिल्ह्याचे  पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी श्री शनैश्वर देवस्थानच्या माध्यमातून  गोरगरीब जनतेसाठी व ज्यांना खरच धान्य भेटलेले नाही अशा व्यक्तींना तालुका प्रमाणे उमरगा व लोहारा तालुक्यासाठी 1500 किट  दिले आहेत. त्या किटमध्ये अत्यावश्यक वस्तू देण्यात आले आहेत. मुरुम शहरासाठी 300 किट आले आहेत तर ते किट गोरगरीब जनतेला आमदार ज्ञानराज चौगुले, युवानेते किरण गायकवाड यांच्या सहकार्याने मुरुम शहरात 300 किट वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना  उमरगा उपतालुका प्रमुख चंद्रशेखर मूदकणा, युवासेना तालुकाप्रमुख अजित चौधरी, मुरुम शहर प्रमुख बाबासाहेब 
कटारे, शाहूराज शिंदे, राजेंद्र कारभारी, विशाल मोहिते, शिवराज ख्याडे आदीच्या हस्ते किट वाटप करण्यात आले.विधवा महिला, घरात अपंग असलेले व्यक्ती, वयस्कर मंडळी आशा नागरिकांना किटचे वाटप करण्यात आले. पालकत्वाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पालकमंत्री शंकरराव गडाख यांचे आभार मानले.
 
Top