कळंब (प्रतिनिधी) -
हासेगाव (के) तालुका कळंब येथे गावचे सरपंच विश्वंभर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत च्या वतीने कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर करण्याची ही यंत्रणा बसवण्यात आली असून दररोज गावात प्रवेश करते वेळेस आणि गावातून बाहेर जाताना येथूनच जाणे करिता गावातील युवक मार्गदर्शन करत आहेत,  दि. 15 रोजी याचे उद्घाटन करण्यात आले आहे.
 यावेळी कळंब पंचायत समितीचे सहायक गटविस्तार अधिकारी तसेच विस्तार अधिकारी जाधव, सरपंच विश्वंभर आप्पा पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे,  युवा नेते किरण पाटील, संदीप धुमाळ, ग्रामसेवक मानकरी, अमोल पांचाळ, ज्ञानेश्वर तोडकर आदी उपस्थित होते.
 
Top