उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 उस्मानाबाद जिल्हयात कोरोना काळात कर्फ्यू असताना दिल्या जाणाऱ्या अत्यावश्यक सेवा पास वाटपात घोटाळा झाल्याचे समोर आले असून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
 जिल्ह्यातील तहसील, नगर परिषद व आरटीओ कार्यालयातून दिलेल्या पासची चौकशी आहे. प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने गरज नसताना व कोणतेही रेकॉर्ड न ठेवता पास वाटप केले असून ओळखीचा व वशिला असला की सर्रास खैरात वाटप केल्यासारखे पास वाटप केले. हे पास वाटप करताना कोणतेही रेकॉर्ड ठेवले नाही शिवाय पासवर वरिष्ठ अधिकारी यांच्या सह्या सुद्धा घेतल्या नाहीत. एकट्या उस्मानाबाद तहसील कार्यालयाकडून 600 पास वाटप केले असून इतर कार्यालयाची स्तिथी जवळपास सारखीच आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतरही कर्म्युचे तीनतेरा वाजल्याचे वारंवार समोर आले आहे. पोलीस व प्रशासनाने कायदेशीर बडगा उगारला की तेव्हढ्या पुरतीच शिस्त असा विषय उस्मानाबाद जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. अनेक जण अत्यावश्यक सेवेच्या नावाखालीरस्त्यावर खुलेआम फिरत आहेत त्यामुळे या पास वाटपाची चौकशी होणार आहे. उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे पास वाटपाची चौकशी करणार आहेत.

 
Top