परंडा/ प्रतिनिधी  -
गटविकास अधिकारी  परंडा यांचे कडून मागण्यांची पुर्तता केल्याने  प्रहार शिक्षक संघटनेचे गाजर वाटप आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
  शिक्षकांच्या विविध प्रलंबित न्याय मागण्यासाठी दि.1 फेब्रुवारी  रोजी पंचायत समिती परंडा कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन केले.आंदोलनाची सांगता करताना आंदोलनकर्ते शिक्षकांना मागण्या पूर्ण केल्याचे सांगत आंदोलन मागे घेण्याचे लेखी पत्र दिले.परंतू महिना उलटूनही मागण्या पूर्ण होत नसल्याने 2 मार्च 2020 रोजी गटविकास अधिकारी परंडा यांना दि.13मार्च 2020 पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक 16 मार्च 2020 रोजी गाजर वाटप आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
 परंतू निवेदनातील न्याय मागणीनुसार -सातव्या वेतन आयोगतील फरकाची जीपीएफ मध्ये जमा होणा-या बीलाची एक प्रत वैजिनाथ सावंत यांना दिली,शेळगाव शाळेचा रितसर लेखी चार्जपट्टीसह पदभार मुख्याध्यापक रघुनाथ दैन यांना देण्यात आली, केंद्रीय मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख तांदुळवाडी यांचा प्रभारी पदभार काढण्यात आला. याबाबतचे लेखी पत्र दि.12 मार्च  रोजी गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर  यांनी प्रहार शिक्षक संघटनेला दिल्याने दि.16 मार्च  चे नियोजित गाजर वाटप आंदोलन मागे घेण्यात आल्याचे जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ सावंत यांनी सांगितले. यावेळी रघूनाथ दैन व पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top