कळंब /प्रतिनिधी -
तुळजापूर तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा देवसिंगा तूळ येथे दि. 12 मार्च रोजी स्वयं शासन दिन साजरा करण्यात आला.
इयत्ता 7 वी च्या विद्याथ्र्यांनी शिक्षक भूमिका निभावून अध्यापनाचे काम केले. समीक्षा मस्के हिने मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले. ऐश्वर्या देवकर, श्वेता भोसले, अस्मिता उघडे, समर्थ शिंदे, सुनील मस्के यांनी अध्यापनाचे कार्य केले. त्यानंतर इयत्ता 7 वी च्या विद्याथ्र्यांना निरोप देण्यात आला. 7 वी च्या विद्याथ्र्यांनी शाळेला एक फॅन भेट दिला. यावेळी शाळा समिती अध्यक्ष रामराव भोसले, राहुल जाधव यांच्यासह मुख्याध्यापक अनंत फुलसुंदर, सहशिक्षक अशोक चव्हाण, श्रीमती मीनाक्षी साखरे, श्रीमती त्रिंबके आणि विद्यार्थी उपस्थित होते.
 
Top