तुळजापूर/प्रतिनिधी-
करोना वायरसने जगभर थैमान घातले असुन भारतात ही याचे आगमन झाले आहे, सर्वच पातळीवर या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शाषण खबरदारी घेत असुन या अनुषंगाने तिर्थक्षेञ तुळजापूर-येथील उपजिल्हा रुग्णालयात पाच बेड चा स्वतंत्र कक्ष शुक्रवार दि.6 पासुन सुर करण्यात आल्याची, माहीती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण रोचकरी यांनी दिली.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेचा दर्शनासाठी देशभरासह परदेशातुन भाविक येतात. तिर्थक्षेञ तुळजापूर येथे मंदीरात बसस्थानक वाहनतळ मंदीर परिसर मंदीराकडे येणा-या रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी असते येथे करोना वायरस फैलावण्याची मोठी शक्यता असते.
या करोना वायरस चा फैलाव तिर्थक्षेञ होवू नये म्हणून तिर्थक्षेञ येथील उपजिल्हा रुग्णालयात पाच रुग्णासाठी  स्वातंत्र्य कक्ष तयार करण्यात आला असुन येथे दाखल झालेल्या संशीयत रुग्णावर चोवीस तास निगरानी खाली राहण्यासाठी दोन कर्मचारी व डाँक्टराची नेमणुक केली असुन हा स्वातंत्र्य कक्ष वैद्यकीय अधिकारीचा निगराणी खाली असणार आहे. सध्या उपजिल्हा रुग्णालयात ताप खोकला असणा-या रुग्णावर अधिक लक्ष ठेवले जावुन त्यांचावर तातडीने उपचार केले जात आहेत.

 
Top