वाशी/ प्रतिनिधी-
तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांना ,शेतकऱ्यांना एकाच छताखाली शासनाच्या विविध योजनांची माहिती होऊन लाभ घेण्यासाठी महराजस्व अभियांतर्गत समाधान शिबिराचे वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकात्मिक बाल विकास, पंचायत समिती, पोस्टल बँक (पोस्ट ऑफिस),परिवहन मंडळ, बचत गट , पुरवठा विभाग, महसूल  विभाग यांच्याकडून लाभाथ्र्याची नोंदणी करून घेण्यात आली.
यावेळी सदर शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार डॉ.संदीप राजपुरे ,नायब तहसीलदार सुजाता हंकारे नायब तहसीलदार स्नेहलता पाटील ,तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले,एकात्मिक बालविकास अधिकारी सतीश मुंढे, तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, दुय्यम निबंधक अधिकारी,राज्य परिवहन मंडळ, आरोग्य विभाग आदीसह विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी निवासीउपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी समाधान शिबिरास भेट दिली व सर्व विभागाची चौकशी करून एकही लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये अशी सूचना केली व शिबिराचे कौतुक केले .

 
Top