उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उस्मानाबाद शहरातील उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांचा सत्कार एक्स-ट्रिम फिटनेसकडून करण्यात आला.
यावेळी जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे,  शुभदा पंडित, डॉ.प्रियंका चौरे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक एक्स-ट्रिमच्या संचालिका मानसी डोलारे यांनी केले.  सूत्रसंचालन आणि आभार सरोज देवकुळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शहर व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शबाना शेख, संगीता पाठक, प्रियंका पवार, रंजना पेठे आदींनी परिश्रम घेतले.

 
Top