कळंब /प्रतिनिधी -
कळंब येथे 2007, साली मंजूर असलेले जिल्हा व सत्र न्यायालय दिवाणी न्यायालय वरीष्ठ स्तर  सुरू करावे  अशा मागणीचे निवेदन कळंब तालुका विकास नागरी कृती समितीच्या वतीने  मुख्यमंत्री उद्वव  ठाकरे  यांना उपविभागीय अधिकारी कार्यालयाद्वारे पाठविण्यात आले आहे. हे निवेदन यशवंत हारकर, यांनी स्विकारायलेे.
 कळंब येथे सदरील न्यायालयासाठी नवीन इमारत उपलब्ध आहे. कळंब न्यायालयात चालविल्या जाणा-या प्रकरणाची संख्या मोठी आहे. कळंबच्या नागरिकांना अपिलीय प्रकरणासाठी जिल्हा न्यायालय उस्मानाबाद येथे जावे लागते वेळ व आर्थिक भार पडतो, त्यामुळे कळंब येथे जिल्हा व सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय वरीष्ठ स्तर सुरू करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर प्रकाश भडंगे, महादेव महाराज आडसुळ, माधवसिंग राजपुत, यशवंत हौसलमल, विलास मिटकरी, सुभाष घोडके, भास्कर सोनवणे यांच्या स्वाक्ष-या आहेत.

 
Top