लोहारा/प्रतिनिधी-
सर्वसामान्य नागरीक व शेतकरी यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसुल विभाग यांच्यावतीने महाराजस्व अभियानातर्गंत विस्तारीत समाधान योजना दि.6 मार्च रोजी लोहारा पं.स.च्या सभागृहात राबविण्यात आली.
 महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारित समाधान योजने अंतर्गत विविध खात्यांच्या अधिका-यांनी विशिष्ट दिवशी ग्राम मंडळ स्तरावर महिन्यातुन एका विशिष्ट पुर्वनियोजीत दिवशी एकत्र यावे, जनतेस शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्याची कार्यवाही करणेबाबत शासन निर्णयामध्ये नमुद केले आहे. त्या अनुषंगाने लोहारा बु येथे तालुक्यातील महसुल विभागा मार्फत शेतरस्त्याचे अर्ज स्वीकारण्यात आले. भुकंपग्रस्त प्रमाणपत्र, कबाला वाटप करण्यात आले. तसेच निवडणुक विभागा मार्फत मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती, याबाबत सेवा पुरविण्यात आली. पुरवठा विभाग यांच्यावतीने रेशन कार्ड चे वाटप करण्यात आले. तसेच पी.एम किसान कक्षा मार्फत खातेदार यांच्या अनुदान संबंधीतीच्या समस्या सोडविण्यात आल्या. पीएससी माकणी यांच्यावतीने आरोग्य तपासणी करुन उचित सल्ला देण्यात आला. तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत पोखरा योजना, ऊसासाठी ठिंबक योजना, अदि, योजनांची शेतक-यांना माहिती देण्यात आली. पं.स.लोहारा यांच्या मार्फत रोहयो इत्यादि कार्यालयानी त्यांच्या योजनांची सविस्तर माहिती दिली.
सदरील कार्यक्रमास वरील विभागासह सहा निबंधक , उपअधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, सहा निबंधक कार्यालय, महावितरण कार्यालय लोहारा, महाईसेवा केंद्र या शिबिरात सहभागी झाले होते. सदरील शिबिर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार विजय अवधाने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास नायब तहसीलदार रणजित शिराळकर, अव्वल कारकुन बालाजी चामे, अव्वल कारकुन महादेव जाधव, पी.आर. वडणे, शिवलिंग येरटे, भागवत गायकवाड, महेश क्षीरसागर, संतोष गवळी, सचिन पांचाळ, शंभुराजे पांचाळ, यांच्यासह तालुक्यातील सर्व कार्यालयाचे प्रमुख उपस्थित होते.

 
Top