नळदुर्ग प्रतिनिधी-
देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासुन नळदुर्ग येथील भिक्षा मागुन आपले पोट भरणाऱ्या नाथपंथी डवरी गोसावी कुटुंबियांच्या घरात चुलच पेटली नव्हती. दि.२६ मार्च रोजी या कुटुंबीयांनी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांची भेट घेऊन त्यांची व्यथा व होत असलेली उपासमार सांगितली. कमलाकर चव्हाण यांनी तात्काळ तहसिलदार श्री सौदागर तांदळे यांच्याशी फोनवरून चर्चा केली व गोसावी कुटुंबियांची होत असलेली उपासमार त्यांना सांगितली यावेळी श्री तांदळे यांनी तात्काळ त्यांना वाटप करण्यासाठी धान्याची व्यवस्था केलीण्
 नळदुर्ग येथील गोसावी वस्तीवर दि.२७ मार्च रोजी जाऊन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, शहरप्रमुख संतोष पुदाले,उपतालुकप्रमुख सरदारसिंग ठाकुर, उपशहरप्रमुख शाम कनकधर यांनी नाथपंथी डवरी गोसावीच्या १५ कुटुंबियांना गहु आणि तांदळाचे वाटप केले. यावेळी पत्रकार विलास येडगे, तलाठी श्री कदम, पत्रकार उत्तम बनजगोळे, दादासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे,चंदू सगरे  आदींची उपस्थिती होती.

 
Top