तुळजापूर/प्रतिनिधी-
कोरोना आजाराचा फैलाव होवु नये म्हणून श्री तुळजाभवानी मंदीरात भाविकांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मंगळवारी दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पहावयास मिळत आहे.
कर्नाटक सह महाराष्ट्रातील अनेक भाविकांना मंदिर प्रवेश बंद निर्णयाची माहिती नसल्यामुळे ते भाविक सोमवारी रात्री दाखल झाले होते. हे भाविक पहाटे दर्शनासाठी मंदिरात जाण्यासाठी आल्यानंतर त्यांना प्रवेश बंदाच्या निर्णयाची माहिती मिळाल्याने, नाराज होवुन त्यांना परत जावे लागले.
आठवडी बाजारात शुकशुकाट 
तिर्थक्षेञ तुळजापूरात मंगळवारी भरणारा आठवडा बाजार पुढील आदेश येई पर्यत बंद ठेवण्यात येणार असल्याच्या सुचने नंतर मंगळवारी आठवडी बाजार भरला नाही त्यामुळे लाखो रूपयांची उलाढाल झाली नाही. तसेच या आठवाडी बाजार परिसरात शुकशुकाट दिसून आला.

 
Top