उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर उस्मानाबाद शहरातील मोठ्या प्रमाणात गर्दी होणार्‍या पानपट्टी, बिअरबार व हॉटेल देखील बंद करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शहराचे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत जिल्हयाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सध्या जगभरात कोरोना आजाराच्या प्रार्दुभावामुळे सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. केंद्र व राज्यशासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हयातील शाळा, कॉलेज, व्यायाम शाळा, जलतरंण तलाव, आठवडी बाजार, मॉल बंद करण्याचे आदेश आपण दिले आहेत. त्याच प्रमाणे शहरातील मोठ्या प्रमाणात गर्दी होणार्‍या पानपट्टी, बीयरबार व हॉटेल देखील बंद करण्याचे आदेश आपल्या स्तरावर व्हावेत जेणे करून गर्दीमुळे कोरोना आजाराचा प्रभाव थांबविणे शक्य होईल, या पत्रकात नमुद केले आहे. नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांची निवेदनावर स्वाक्षरी आहे.
 
Top