परंडा /प्रतिनिधी
परंडा तालूक्यातील आवारपिंपरी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना रोगाच्या नियंत्रणासाठी संपूर्ण आवारपिंपरी गावात मा.सरपंच सुरेश डाकवाले यांच्या नेतृत्वाखाली दि.२८ रोजी टीसील औषधाची ची फवारणी करण्यात आली.
तसेच  गावातील नागरिकांमध्ये कोरोना रोगाविषयी जनजागृती करण्यात आली व  बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांची माहिती आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने सर्व लोकांची माहिती गोळा करून प्रशासनास कळविण्यात आली आहे.
गावात फवारणी व जनजागृती करते वेळी गावचे ग्रामसेवक ढाकणे साहेब,सरपंच श्रीहरी गुडे ,उपसरपंच कल्याण घळके,मा.सरपंच देशभूषण सावळे,तानाजी ओव्हाळ, पायाबा नरुटे, श्रीराम नरुटे,दादासाहेब पाडुळे,विश्वास गूडे, अतुल नरुटे,प्रवीण डाकवाले,राकेश सुसलादे,योगेश नरुटे,हनुमंत ओव्हाळ, अमर ओव्हाळ,भाऊ घोडके,प्रीतम ओव्हाळ, यांनी सहभाग घेऊन विशेष सहकार्य केले.

 
Top