भूम/प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती भागात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची ११ केव्हीची मोठी विद्युत वाहिनीची तार कोसळून खाली पडली. यावेळी नागरिकांच्या संतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
शहरातील फ्लोरा चौक  येथे एम.एस.ई.बी ऑफिस समोरून जाणारी ११ केव्हीच्या मोठ्या विद्युत लाईनची एक तार कोसळून खाली पडली, यावेळी मोठा आवाज ही झाला होता. ही घटना २९ फेब्रुवारीच्या दुपारी २ वाजता घडली. परंतु नागरिकांच्या संतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. विद्युत तारा खाली कोसळू नये म्हणून संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे

 
Top