कळंब/प्रतिनिधी-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक मध्यवर्ती जयंती उत्सव कळंब यांच्या विद्यमाने लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व पाक्षिक मूकनायक या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या पाक्षिकाचा शंभर वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून दिनांक 12 व 13 एप्रिल 2020 रोजी कळंब येथे दोन दिवसीय पहिले अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ.जनार्दन वाघमारे लातूर यांची निवड करण्यात आली आहे. तर या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. प्रतापसिंह पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही.सरवदे, रमेश बोर्डेकर, दत्ता गायकवाड, किशोर वाघमारे, सचिन क्षीरसागर, विशाल वाघमारे, उत्तम कांबळे, शीलवंत गुरुजी, सी.आर. घाडगे,डी.टी.वाघमारे, विठ्ठल समुद्रे, भारत जाधव, यु.एल.घोडके,अनिल हजारे,भास्कर सोनवणे,अरुण गरड हे उपस्थित होते. या निवडी झाल्याचे या संमेलनाचे मुख्य संयोजक प्रा.डॉ. संजय कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे

 
Top