कळंब /प्रतिनिधी-
रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी आयोजित भव्य राज्यस्तरीय मांजरा कृषी महोत्स
वाच्या पहिल्या दिवशी क्रडॉग शोञ्ज चे आयोजन करण्यात आले होते व यासाठी 180 डॉग ची नोंद झालेली होती. यामध्ये वेगवेगळ्या  जातीचे डॉग चा समावेश करण्यात आला होता. यावेळी प्रामुख्याने.प्रत्येक ग्रीडमधून तीन नंबर काढण्यात आले होते व सकाळी 11 वाजता चालू झालेला हा शो सायंकाळी 05 वाजता संपला.
यामध्ये अनुक्रमे शो ऑफ द डॉग- सचिन शेळवणे,   डॉबरमॅन प्रथम सचिन शेळवणे,  द्वितीय शेख मुखीद, तृतीय संदीप काळजाते.  ग्रेट डेन- प्रथम अभिजीत सगरे, द्वितीय सागर दिक्कत, तृतीय महादेव जगताप.  कारवान-प्रथम अमोल नेहरकर, द्वितीय दिलीप ननवरे.  ग्रेहाँड- प्रथम केशव लांडगे, द्वितीय धिरज विधाते, तृतीय विजय जकडिया, पामोलियन-प्रथम जांलिधर भास्करे, द्वितीय उषा गवारे, तृतीय मयूर पिसुरे.  रॉटविलर.-प्रथम राजाभाऊ क्षिरसागर, द्वितीय उषा गवारे, तृतीय राहूल शिंदे, जर्मन शेफर्ड- प्रथम अजय वाघमारे, द्वितीय मेजर खंडागळे, तृतीय शेख मुखीद,  लॅब -प्रथम धनंजय फकिरा, द्वितीय ओमकार घुले, तृतीय रामा तांबार यांनी पटकाविला. या डॉग शोचे परिक्षक म्हणून डॉ. नेताजी शिंगटे, डॉ. रवि ढवळे,  डॉ. अवघडे, डॉ. अक्षय हजारे यांनी काम पाहिले.
 हा शो झाल्यानंतर लगेच बक्षिसाचे वितरण हे रोटरी क्लब चे अध्यक्ष हर्षद आंबूरे, सचिव डॉ. हनुमंत चौधरी तसेच विविध रोटरी मेंबर्स यांच्यामार्फत त्यांना ट्रॉफी देऊन करण्यात आले.
 
Top