उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हयात एक ही कोरोनाचा संशयीत रूग्ण नाही, याबाबत सोशल मीडियामध्ये कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन जिल्हा शासकीय रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे-पाटील यांनी केले आहे.
याबाब पुढे बोलताना डॉ.गलांडे यांनी सांगितले की, अद्यापर्यंत कोरोनाचा एकही संशयीत रूग्ण नाही, याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही अफवा पसरवू नये, मंगळवारी उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी येथील एक व्यक्ती पुण्याहून गावाकडे आला होता. गावकर्‍यांनी त्यास गैरसमजातून जिल्हा रूग्णालयात आणले होते. परंतू त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती, सदर व्यक्तीस शारीरिक कोणतीही तक्रार नाही, तो अगदी ठणठणित आहे तो निरोगी व्यक्ती आहे. याबाबत सोशल मीडियामध्ये कांही काळ अफवा पसरल्याने संभ्रम निर्माण झाला होता.परंतू जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गलांडे यांनी जिल्हयात एकही कोरोनाचा संशयीत रूग्ण नसल्याचे सांगितले. याबाबत कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. 
 
Top