भूम /प्रतिनिधी-
आष्टा फाटा ते कानडी या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम आनेक महीन्यापासुन सुरु आहे. सदरचा ग्रामीण रस्ता क्रक्र 62  असुन  हे काम  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत होत आहे.  हा 8 किमी पर्यंत डांबरीकरणाचा रस्ता आहे. परंतु ठेकेदाराच्या मनमानीपणामुळे या रस्त्यावरील अतिक्रमणे न हटवताच  कामास सुरूवात केली आहे. अतिक्रमण हटविल्या नंतरच या रस्त्याचे काम करा या मागणीसाठी ग्रामस्थानी रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी नायब   तहसिलदार स्वेता आलाट ,गटविकास अधीकारी यांनी  आंदोलस्थल भेट देऊन २३ मार्च पर्यंत हा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मांगे घेण्यात आले.
 
Top