उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कांही चुकीच्या अफवा पसरविल्या जात असल्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.एखादाला खोकला किंवा ताप आला म्हणजे तो करोना नव्हे तर त्या रूग्णाचा पुर्व इतिहास तपासून उपचार करने योग्य राहिल. करोना रूणांवर योग्य उपचार केल्यास तो रूग्ण बरा होतो. त्यामुळे जिल्हयात करोना रूग्ण आढळल्यास सर्व यंत्रणा सज्ज आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 जगात खळबळ उडविणा-या करोना आजारा विषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन गुरूवार दि.१२ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदचे सीईओ डॉ. संजय कोलते, पोलिस अधिक्षक राजतिलक रौशन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे, डॉ.स्वामी आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना, जिल्हाधिकारी यांनी करोना आजारामध्ये १०० मध्ये १.४ टक्के रूग्ण दगावण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाबरण्याचे गरज नाही, १.९५ मास्र्क  हा फक्त डॉक्टरसाठी आवश्यक आहे, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी साधा मास्र्क चा उपयोग करण्यास हरकत नाही.
 जिल्हयात आपतकालीन कायदा लागु केल्यामुळे गैरकायदेशीर मेडीकल प्रॉक्ट्रीसवर व जादा दराने औषध व अन्य वस्तूंची विक्री करणा-यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिका-यांनी दिला.यावेळी डॉ.कोलते व राजतिलक रौशन यांनी ग्रामीण भागात बैठका घेऊन सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात असून, आफवा पसरविणा-यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, कोणत्याही बातमीची वस्तूस्थिती व वस्तूनिष्ठ माहिती घ्या, असे आवाहन त्यांनी केले.                                                                                                      मंदिरातील गर्दी घटली
महाराष्ट्रातील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात दर मंगळवार व शुक्रवारी हजारो भाविक दर्शन घेतात. गेल्या मंगळवारी तीन मार्च रोजी ३५ हजार भक्तांनी दर्शन घेतले होते. तर परवाच्या १० मार्चच्या मंगळवारी १० हजार भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले.
 
Top