उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतक-यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून शेतक-यांना आर्थिक मदत जाहीर करण्यावत यावी, अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हाधिका-यांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात अवकाळी पावसामुळे शेतक-यांचा गहू, ज्वारी, हरभरा ही पिके भुईसपाट झाली असून द्राक्ष, आंबा, पपई, दाळिंब, मोसंबी आदींचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रूपये शेतक-यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर मनसे सहकार सेनेचे दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, आबासाहेब ढवळे, माजी जिल्हाध्यक्ष अमरराजे कदम, जिल्हा सचिव दादा कांबळे, बाळासाहेब कोठावळे, तालुकाध्यक्ष पाशा शेख आदींच्या स्वाक्ष-या आहेत.