तुळजापुर/प्रतिनिधी-
येथील श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान प्रशासन कार्यालयात दि.2 सोमवार रोजी श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान व सर्व पुजारी मंडळ यांच्यामध्ये श्री देवी दर्शनासाठी  येणा-या भाविकांच्या सुख सुविधा आदीसह विविध विषयावर एक बैठक झाली. यामध्ये अभिषेक मंडप,दर्शन मंडप, मंदीरमधून बाहेर येण्यासाठी मार्ग, धार्मिक करवाढ या विषयावर चर्चा झाली आहे.
यावेळी संभाजी राजे प्रांगणात, अभिषेक मंडप आणि राजेराम प्रांगणात आराध्य सेवा रूम करण्यात याव्यात ,तसेच मंदीर मधून बाहेर येण्यासाठी मार्ग मोठा करावा तसेच विकास कामे प्रथम करण्यात यावेत, अशी ठाम भूमिका पुजारी मंडळांनी मांडली, त्यावर नगराध्यक्ष, भोपे पुजारी मंडळ ,पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये पुजारी मंडळ,व्यापारी मंडळ, यांनी ही हीच भूमिका योग्य आहे, असे मत मांडले आहे. दर्शन मंडप बाबत सर्वांनी एकत्र येऊन विरोध दर्शविला आहे, धार्मिक विधी कर वाढ बाबत सर्वांनी एकत्र येऊन विरोध दर्शविला आहे, अभिषेक रांगेबाबत चर्चा व निर्णय घेण्यात आला. व्हीआयपी  दर्शन गैरव्यवहार बाबत चर्चा झाली जो कोणी व्ही.आय.पी.असेल त्याचां आय डी प्रुप घेण्यात यावा आदी बाबत निर्णय घेण्यात आले.
सदरील या बैठकीस श्री.कोल्हे (तहसीलदार),सचिन रोचकरी  (प्र.नगराध्यक्ष),महंत तुकोजी बुवा, सज्जनराव साळुंके पाळीकर पुजारी मंडळ (अध्यक्ष),विपीन शिंदे(उपाध्यक्ष),व सदस्य, अनंत कोंडो (अध्यक्ष उपाध्ये मंडळ ) व सदस्य,   सुधीर कदम (अध्यक्ष भोपे पुजारी मंडळ ) व सदस्य, श्रीनाथ शिंदे (व्यापारी मंडळ ), किशोर गंगणे,मंदीर मधील अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पुजारी बांधव, सेवेदार आधी मान्यवर उपस्थित होते.

 
Top