उमरगा/प्रतिनिधी-
रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दि.01 मार्च रोजी उमरगा लोहारा तालुक्याच्या दौरा केला. या दौ-यात ( चिंचोली भू. व गुंजोटी ता.उमरगा) येथे रोजगार हमी योजनेतून सुरु असलेल्या कामांचे भूमिपूजन व पाहणी करून शासकीय विश्रामगृह, उमरगा येथे शिवसेना पदाधिकारी व नागरिकांशी संवाद साधला. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भेट दिली याठिकाणी त्यांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महाशिवरात्रीनिमित्त श्री.सिद्धेश्वर यात्रेत जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालय, कसगी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य पशुप्रदर्शनात विविध प्रकारातील विजेत्या पशुपालकांना पारितोषिक वितरण समारोह संपन्न झाला. या पशुप्रदर्शनात सर्व गटातुन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रक्रमांक पटकावलेल्या पशुपालकांना रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे व प्रमुख पाहुन्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.रवींद्र गायकवाड व प्रमुख अतिथी म्हणून खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एन.बी.आघाव, नगरसेवक सोमनाथ गुरव, माजी सरपंच हणमंत गुरव, यात्रा कमिटीचे अध्यक्ष व्ही.वाय.जाधव, सरपंच बबिता कांबळे, यांसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, पशुपालक, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.