भूम/प्रतिनिधी-
शहरातील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यानिमित्त आयोजित फेस्टिव्हलचे उद्घाटन मराठवाडा विभागाचे अतिरिक्त आयुक्त शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते झाले.
 यावेळी व्यासपीठावर स्नेहग्रामचे महेश व विनया निंबाळकर, प्रयागबाई कांबळे, भाऊसाहेब कुलकर्णी, फैजान काझी, प्राचार्य संतोष सबस्तीयन आदीं उपस्थित होते.  यावेळी उपस्थित मान्यवराच्या हस्ते गुणवंत विद्याथ्र्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
 यावेळी विद्याथ्र्यांनी लावणी, मराठी, हिंदी, गितोंपर नृत्याचे सादरीकरण  करून सर्वांची मने जिंकली. यावेळी महेश निंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले तर फैजान काझी यांनी प्रमुख पाहुणे यांचा परिचय करून दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 
Top