तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील आरळी बुद्ुक येथे महोत्सव समिती व नरेंद्राचार्य सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने "जिल्हास्तरीय हिरकणी पुरस्काराचे दि. 7 मार्च रोजी वितरण करण्यात येत आहे.
जिल्हास्तरीय हिरकणी पुरस्काराचे वितरण माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे, जि. प. माजी उपाध्यक्ष अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील, तहसीलदार सौदागर तांदळे, तहसीलदार तथा मंदिर समिती व्यवस्थापक योगिता कोल्हे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तालुका क्रक्रीडा अधिकारी सारिका काळे, पत्रकार श्रीकांत कदम, सतीश महामुनी, पंचायत समिती माजी सभापती शिवाजीराव गायकवाड, उपसभापती चित्तरंजन सरडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना हिरकणी पुरस्कार देऊन समितीच्यावतीने गौरव करण्यात येणार आहे. तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पारवे यांनी केले आहे.

 
Top