उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक 15 मार्च रोजी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काय काय उपाययोजना आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत याची माहिती घेण्यासाठी  जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी जिल्हा रूग्णालयाला भेट देऊन प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करीत आहे, याची माहिती घेण्यात आली. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनासहीत उच्च पातळीवरून सिव्हील सर्जन डॉ.राजाभाऊ गलांडे यांच्याकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो, त्यामुळे मनसेच्या पहाणीचा नेमका हेतु काय आहे, याची  एका नेत्यामुळे चर्चा सुरू आहे.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गंलाडे पाटील यांनी मनसेच्या पदाधिका-यांना सर्व उपाययोजनेची माहिती देवून व जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना हा आजार होवू नये यासाठी गर्दीचे ठिकाणी जाण्याचे टाळावे, बाहेरून घरी आल्यानंतर हात साबनाने धुवावे, सर्दी खोकला ताप आल्यानंतर डॉक्टराशी संपर्क साधावा, खोकला आल्यानंतर रूमालाचा किंवा तोंडाला आडवा हात लावून खोकावे असा सुचना करून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.

 
Top