भूम/प्रतिनिधी-
संजय नाना गाढवे प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त लकी ड्रॉ च्या माध्यमातून संसार उपयोगी लाखो रु. बक्षीसाचे वितरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम नगर परिषदेच्या समोर सायंकाळी ५.३० वाजता सुरू होणार आहे, तरी जास्तीत जास्त महिलांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन, यावेळी  जिल्हा नियोजन समिती तथा उपनगराध्यक्ष संयोगीता गाढवे  यांनी केले.
8 मार्च रोजी लकी ड्रॉ मध्ये भाग्यवान 15 महिला बचत गटांना बँक कर्ज वाटप, भाग्यवान 36 महिला गटास फिरता निधी वाटपा सोबत लकी महिलांना संसार उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम   मुख्य अतिथी सिनेतारका सोनाली कुलकर्णी, युवा व्यख्यता  गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

 
Top