परंडा /प्रतिनिधी -
येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयातील विज्ञान विभागाच्या विद्यार्थिनी मोमीन नूज्जत खलील आणि पटेल सानिया यांनी स्टेट लेव्हल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा यश संपादन केले. त्यानंतर दोघींचा ही सत्कार शिक्षण महर्षी गुरुवर्य शिंदे महाविद्यालयात प्राचार्या डॉ. दीपा सावळे यांच्या हस्ते करण्यात आला.
महाविद्यालयातील सायन्स फोरमचे समन्वयक प्रा.अमर गोरे पाटील यांचे या विद्यार्थीनींना मार्गदर्शन लाभले. श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी त्या दोघेंचे ही अभिनंदन केले. सत्कार समारंभाच्या प्रसंगी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे ,भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. महेशकुमार माने,नॅकविभाग प्रमुख प्रा.विद्याधर नलवडे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अक्षय घुमरे, वनस्पती शास्त्राचे प्रा.डॉ.सचिन चव्हाण आणि प्रा.निखील अडसुळे आदींची उपस्थिती होती.