भूम /प्रतिनिधी-
पैसे देण्या घेण्याच्या कारणावरुन मनात राग धरुन एकास गोळी घालुन ठार मारल्याची घटना दि 29 फेब्रुवारी रोजी पाटसांगवी ता भूम येथे घडली होती या  प्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दि 1 मार्च  रोजी रात्री उशिरा भूम पोलिसात  दाखल झाला आहे
याबाबत अधिक माहिती अशी मयत दस्तगीर उर्फ शहानुर जिलानी पटेल रा पाठसांगवी हे व बाबा उस्मान पटेल रा पाटसांगवी हे दि 29 रोजी मयताच्या घरी सायंकाळच्या दरम्यान अंगणात दारु पित आसताना त्याच्यात पैसे देणे घेण्याचा वाद झाला होता त्याचा राग मनात धरुन अरोपी बाबा उस्मान पटेल याने  त्यांच्या जवळील बंदुकिने दस्तगीर उर्फ शहानुर जिलानी पटेल यांना जिवे मारले आसल्याची फिर्याद मयताची पत्नी दिलशाद दस्तगीर पटेल वय 38 रा पाटसांगवी यांनी दिल्याने भूम पोलिसात 302 भादवी सह 30 भारतीय हत्यार कायद्या प्रमाण बाबा उस्मान पटेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पुढिल अधिक तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ करित आहेत दरम्यान या प्रकरणातील अरोपी यास भूम पोलिसांनी भूम न्यायालयात हजर केले आसता पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे .

 
Top