तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजापूर नगर परिषद च्या वतीने  शहरातून  कोरोना वायरस विषयी जनजागृती रॅली काढून स्वच्छता  राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.रॅली मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध घोषणा व फलकांच्या माध्यमातुन भाविक व नागरिकांना माहिती दिली. या रैलीस नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ तुळजापूर खुर्द येथून प्रारंभ झाला.
यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकर, मुख्याधिकारी आशिष लोकरे,  नगरसेवक  विजय  कंदले ,पंडितराव जगदाळे ,नागेश नाईक,  राहुल खपले,  अभिजित कदम , श्रीनाथ शिंदे,  विनोद नेपते, हनुमंत पुजारी, मुख्याध्यापक  मोटे तुकाराम, सहशिक्षक अशोक शेंडगे, जालिंदर राऊत , विश्वजीत निडवंचे, बालाजी साळुंखे, गायकवाड नीता, कुलकर्णी निर्मला, भोरे प्रणिता, पाठक राधिका यांच्या सह नगर परिषदेचे संपूर्ण कर्मचार, अधिक्षक वैभव पाठक, स्वच्छता विभाग प्रमुख श्री शेख , शिक्षण विभाग प्रमुख सतीश यादव आदींची उपस्थिती होती. या रॅली सांगता  विद्याथ्र्यांना खाऊचे वाटप करून करण्यात आली.

 
Top