काटी/प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवाशी तथा पुणे ग्रामीण परिसरातील गंगा नगर फुरसुंगी या ग्रामीण परिसरात शिक्षण घेऊन एम.एस.सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ.दिपिका उत्तम काळे यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर प्रतिकुलतेवर मात करून करियरची अन्य क्षेत्र झिडकारून शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याचा घेतलेला निर्णय आज काटी सारख्या ग्रामीण भागातील महिलांसाठी आदर्श ठरतोय. डॉ. दिपिका काळे या येथील माजी सैनिक उत्तम काळे यांच्या तृतीय कन्या आहेत. सर्व सामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. दिपिका काळे यांनी ग्रामीण भागातून जावून पीएचडी मिळवल्याने काटीसह परिसरातून कौतुक होत आहे.

 
Top