तुळजापुर/प्रतिनिधी=
माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांची नात कुमारी ऐश्वर्या उल्हास बोरगावकर हिने पुणे येथील संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरिपी संस्थेमधून डॉक्टरेट पदवी संपादन केली असून या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपी चे चेअरमन डॉ. पराग संचेती, प्राचार्य डॉ. विवेक कुलकर्णी,  आणि कार्यकारी संचालक मनीषा संगवी यांनी ऐश्वर्याला प्रमाणपत्र देऊन सत्कार केला आहे. या यशाबद्दल राज्याचे माजी मंत्री मधुकराव चव्हाण, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर या मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे.

 
Top